26 July 2005 An unforgettable day
२६ जुलै २००५, माझ्या आयुष्यातला अत्यंत भयावह आणि आठवणीत कोरला गेलेला दिवस.. अख्खा महाराष्ट्र भर पावसाने धुमाकूळ घातला होताच पण मुंबई मध्ये मी तो पूर्ण दिवस आणि रात्र ज्या पद्धतीने जीव मुठीत धरून काढला ते कधीच विसरू नाही शकत. खरं तर मी नुकतीच मुंबईला गेले होते आणि रिलायन्स इन्फोकॉम मध्ये नोकरी करायला सुरुवात केली होती.. राहायला सेंट्रल माटुंगा आणि नोकरीसाठी चर्चगेट गाठावे लागायचे रोज.. त्या दिवशी मला आठवत नाही पण कशासाठी तरी मी सुट्टीवर होते आणि अचानक काही कामासाठी मला अंधेरी मध्ये सातबंगला येथे जायला लागलं.. माटुंग्याहून दुपारी एक दीड वाजता निघून इच्छित स्थळी पोचायला मला साधारण अडीन वाजले होते, पाऊस सकाळपासून थांबायचं नावच घेत नव्हता. मी मुंबईमध्ये अनुभवत असलेला पहिलाच जोरदार पाऊस होता तो. मी माझे काम करून साधारण अर्ध्या पाऊण तासाने तिथून बाहेर पडले आणि जरा हबकलेच.
पावसाने इतका जोर पकडला होता की समोरचं तर काही दिसत नव्हतं च पण ज्या इमारतीत मी गेले होते, तिच्या पार्किंग मध्ये पूर्णपणे पाणी भरलं होतं. मी बाहेर येऊन बघते तर काय, नदीचं वाहायला लागली होती जशी.. माझ्या गुडघ्यापर्यंत पातळी गाठली होती पाण्याने, बर या सगळ्यामुळे बस , रिक्षा, टॅक्सी दिसायला ही तयार नव्हते रस्त्यांवर. कुणी दिसलंच तर थांबायला तयार नव्हतं. महत्प्रयासाने एका रिक्षावाल्याने मेहेरबानी केली आणि एकदाची मी रिक्षात बसून अंधेरी स्थानकाकडे निघाले, अर्थात असा माझा गैरसमज च ठरला.. सातबंगला बस आगारापासून जेमतेम पाच मिनिटं अक्षरशः रांगत असल्यासारखी कशीबशी ती रिक्षा पुढे गेली आणि पाण्याचा वाढता लोंढा पाहून चालकाचे अवसान गळाले.. त्याने सांगून टाकले की ताई पैसे नका देऊ तुम्ही, उतरून घ्या, मी काही माझी गाडी पुढे नेण्याचं धाडस नाही करू शकत.. मला ही काय करावं ते सुचत नव्हतं, शेवटी मी त्याचे जे काय पैसे झाले ते त्याला जबरदस्तीने देऊन रिक्षातून उतरून घेतलं .
आता परिस्थिती अशी होती की अंधेरी स्थानका पर्यंत चालत जाण्यावाचून गत्यंतर उरलं नव्हतं. पाणी तर वाढतच होतं, वरून पाऊस ही भयाण झोडपत होता, नेलेल्या छत्रीने बिचारीने खूप वाचवायचा प्रयत्न केला मला, पण पाणी एव्हाना माझ्या कंबरेपर्यंत पोचले होते आणि मी चाललेले अंतर म्हणजे फक्त चारबंगला चौकापर्यंत. मी चालत राहिले, पण तेवढ्यात समोरून एकजण रिक्षा घेऊन आला आणि म्हणाला *मॅडम किधर जा रहे हो? स्टेशन की तरफ जा रहे हो तो यहाँ से मत जाओ क्यूंकी पूरा एस वी रोड डूब रहा है पानी मे*..मी त्यामुळे अजून जास्त तणावात.. त्याच्याशी थोडे बोलेपर्यंत पाणी माझ्या कमरेवरून पुढे छातीच्यावर पोचले होते, पाऊस थांबणे तर सोडाच पण कमी होण्याचं ही नाव घेत नव्हता. मला जाम भीती वाटायला लागली होती .. पण तरी ही मी पुढे चालत राहिले.. शेवटी डी एन नगर चौकात मात्र, पोलिसांनी अडवले आणि उजवीकडचा वर्सोवा सर्कल चा रस्ता घ्यायला सांगितला.
मी त्या दिशेने चालायला लागले, पाहिलं तर पाणी जरा कमी होतं तिकडे म्हणजे माझ्या कमरे पर्यंत होतेच… पण भीती इकडे अशी होती की सगळे ड्रेनेज झाकणे काढून उघडे केलेले होते पाणी ओसरावे म्हणून, पण ते कुठे कुठे आहेत ते फार लक्षपूर्वक पाहून चालावे लागतं होते. इतक्यात जरा आजूबाजूला पाहिलं तर माझ्यासारखे बरेच जण असेच रस्ता दुभाजकाच्याअगदी बाजूने चालत होते.. थोड्यावेळाने सगळ्यांनी नकळत पणे एकमेकांचे हात पकडुन मानवी साखळी करून चालायला सुरुवात केली.. तेवढाच मानसिक आधार.. ड्रेनेज जिथे होते तिथे साधारण भोवरा तयार झालेला दिसत होता, तसे सगळेजण एकमेकांना सावध करून ते टाळून पुढे जात होतो आम्ही..
त्या रस्त्याला लागून साधारण एक किलोमीटर चे अंतर कापायला मला त्या दिवशी दीड पावणेदोन तासा पेक्षा ही जास्त वेळ लागला म्हणजे अक्षरशः तीन साडेतीन किलोमीटर अंतर चालला त्यादिवशी साधारण दुपारी तीन ते संध्याकाळी सात इतका वेळ लागला.. बसेस गाड्या रिक्षा असा असह्य वाहतूक खोळंबा झाला होता.. मला काय करावे ते सुचेना कारण अंधार झाला होता आणि हातपाय पाण्यातून सलग इतका वेळ चालत राहिल्याने गारठून गेले होते. त्यातून पोहता येत नसल्याने वेगळीच भीती वाटत होती की उघडून ठेवलेल्या ड्रेनेज मध्ये चुकून माकून पाय घसरून वाहून गेले तर घरी कुणाला कळणार ही नाही.. या द्विधा मनस्थिती मध्ये मी एका बस मध्ये चढून घेतलं.. पाहिलं ही नाही की ती बस कुठून कुठे जातेय, मनात फक्त इतकाच विचार की पाऊस कमी झाल्यावर त्या बस मधून उतरून रिक्षाने अंधेरी स्थानक गाठून लोकल ट्रेन ने लवकरात लवकर घर कसं गाठता येईल.. पण बस मध्येही नऊ वाजले तरी पाणी ही ओसरलं नव्हतं आणि पाऊस पण मुसळधार, संततधार… अक्षरशः काहीच सुचेना.. पाणी बसच्या गिअर बॉक्स च्या पातळीवर पोचले होते..
हळूहळू भुकेची जाणीव व्हायला लागली होती.. पण नाईलाज होता. मुकाट्याने बसून राहिले. पण त्यादिवशी माणुसकीचा खूप हृदयस्पर्शी अनुभव ही येणार होता हे माहीत नव्हतं. आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणारी काही भली माणसे सगळ्या बसमध्ये जाऊन आधी पाणी वाटत होती त्यानंतर काही जणांनी गरमागरम तांदळाची खिचडी आणून प्रत्येकाला बशी भरून वाटली.. डोळे भरून आले अक्षरशः.. आज आत्ता ही आठवण लिहिताना ही मला खूप भरून येतंय.. खिचडी खाऊन, पाणी पिऊन आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देऊन दुवा ही दिले.. तोवर नैसर्गिक विधिनी डोकं वर काढायला सुरुवात केली होती, बसमध्ये अनेक स्त्रियांची चुळबूळ सुरू असलेली माझ्या लक्षात आली पण संकोच . शेवटी त्या खिचडी घेऊन आलेल्या सद्गृहस्थांना मी विनंती केली धीर करून, मग त्यांनी आम्हा दहा पंधरा जणींना त्यांच्या घरी नेले.. विद्युत पुरवठा खंडित झाला होता तरी ही या बाबत त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी आम्हा सगळ्यांना याबाबत पूर्ण सहकार्य केलं. आभार मानायला खरोखर शब्द फुटत नव्हते गळा भरून आल्यामुळे. तिथून निघून आम्ही पुन्हा बस मध्ये येऊन बसलो, त्यादिवशी सगळ्या गोंधळात मोबाईल च्या सगळ्या नेटवर्क ने ही मान टाकली होती.. पण कसं कुणास ठाऊक माझ्या एकटीच्या अत्यंत जुन्या फोन चे नेटवर्क मात्र जबरदस्त होते देवाच्या कृपेने.. मग मी जिथे राहत होते, तिथे शेजारच्या काकूंना थोडक्यात परिस्थिती कळवून दिली. ते ही सगळे काळजीत होते माझ्यासाठी.. मग बसमधल्या जवळपास सगळ्याच म्हणजे ज्यांच्या फोनचा इश्यू झाला होता त्या पंचवीस तीस लोकांनी माझा फोन वापरून आपापल्या लोकांना कळवली ओढवलेली परिस्थिती.. रात्रीचे बारा वाजून गेल्यावर मात्र प्रचंड थकवा, असहाय्यपण आणि एकंदरीत दिवसभरातल्या त्रासाने डोळे मिटायला लागले होते.. पण डास ही चावत होते, थंडी ही वाजत होती, अंग ही प्रचंड दुखत होते.. सुचतच नव्हते काय करावे.. शांत बसून राहण्याशिवाय हातात काहीच नव्हते.
अशीच कशीबशी रात्र काढली.. पहाटे पाच वाजता बाहेरचा अंदाज घेतला तर पाऊस थांबला होता आणि पाणी ही बऱ्यापैकी ओसरले होते त्यामुळे धीर एकवटून मी उतरले बसमधून आणि अंधेरीच्या दिशेने चालायला सुरूवात केली.. एरवी जेमतेम अर्ध्या तासाचे अंतर त्यादिवशी मात्र दोन अडीच तासाने संपले.. अंधेरी ला परिस्थिती अशी होती की चर्चगेट पासून आणि चर्चगेट कडे जाणाऱ्या येणाऱ्या लोकल ट्रेन बंद च होत्या आदल्या दिवशी दुपारपासून.. सकाळी सहा नंतर फक्त अंधेरी ते बोरिवली अशी रेल्वे वाहतूक सुरू झाली होती ज्याचा मला काहीच उपयोग नव्हता.. मी पाहिलं तर बऱ्याच जणांनी रेल्वे रुळांवर. चालायला सुरूवात केली होती. मी ही मनाची तयारी करून सकाळी आठ वाजता चालायला सुरूवात केली.. तास पाहायला गेलं तर अंधेरी ते दादर हे अंतर लोकल ने चौदा मिनिटाचेच पण त्यादिवशी चालत असताना जी काय हालत खराब झाली होती की ज्याचं नाव ते.. सकाळी आठ वाजता अंधेरीपसून रुळांमधून चालत निघालेली मी दुपारी दीड वाजता बांद्रा स्थानकात पोचले, तिथून पुढे जाताना पुन्हा खाडीचा अडथळा असल्याने त्याची भीती होतीच मग बाहेर आले , पाहिला तर टॅक्सी सुरू होत्या.. महत्प्रयासाने एकाला विनवणी केली की माटुंग्याला सोड तर त्याने फक्त प्लाझा पुलानंतर असणाऱ्या पारशी डेअरी पर्यंत सोडलं ते ही पूर्णपणे पाचशे रुपये मोजून घेऊन.. वाईट वाटले , मनात विचार आला की कुठे ती आदल्या रात्री भेटलेली , खाऊपिऊ घालणारी देव माणसं आणि कुठे ही अशी परिस्थीती चा गैरफायदा घेणारी संधीसाधू माणसं.. पण नाईलाज होता.. तिथून माटुंग्याला घरी पोचायला साधारण एक तास गेलाच कारण तिथे ही गुडघ्यापर्यंत पाणी होतं च.. खरं तर तिथून माझं राहतं घर मोजून पंधराव्या मिनिटाच्या अंतरावर होतं.. असो..
कशीबशी घरी पोचून पहिल्यांदा गरम पाण्याने आंघोळ केली, काहीतरी खाऊन दुपारी चार वाजता जी झोपले ती दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता उठले.. इतकी शारीरिक आणि मानसिक तणाव घेऊन थकले होते.. उठल्यावर मात्र तडक उठून बॅग भरून बस ने घरी निघून आले.. आज या गोष्टीला जवळपास सोळा वर्ष झाली, आठवताना अजून ही काटा येतो अंगावर पण...
तसं पाहायला गेलं तर अगदीच भोज्ज्याला शिवून ही सुखरूप परत आले होते सुदैवाने, कारण नंतर टीव्ही वर बातम्या पाहताना कळलं होतं की असंख्य माणसं गेली वाहून त्या पाण्यात, बरीच माणसं गाडीच्या काचा बंद असल्याने गुदमरून मृत झाली.. बरीच लहान मुलं देखील वाहून गेली.. पण माझे कर्म असेल कदाचित कुठलेतरी कधीतरी चांगले केलेले की मी सुखरूप राहिले .. मात्र एक लक्षात आले मला याच सव्वीस जुलै दोन हजार पाच मधल्या पावसाच्या प्रलयप्रकोपामुळे . की कुठली ही परिस्थिती आली तरी मी निभावून नेऊ शकते . पण एक सांगू? इतक्या महाभयानक अनुभवानंतर देखील माझी पावसाबद्दल वाटणारी ओढ अजिबात कमी झालेली नाही.. , अजून देखील पहिल्या पावसात भिजण्याचाआनंद मी गमावू नाही इच्छित कधीच..
परमेश्वर आपल्या सोबत असतोच सदैव हे मात्र निश्चित जाणवले या सगळ्या अनुभवा मुळे..
प्रिया तुळजापूरकर
२६/०७/२०२१
kathin paristhist madhun kasa nighyacha va tyatyn kay shikycha ya baddal cha khup chan anubhav ahe ha. vry inspiring experience.
ReplyDeleteThank you.. may I know who's this
DeleteBeautifully described 👏.
ReplyDeleteThank you.. may I know who's this
Deleteअश्या difficult times madhe ch aapli mental ability आणि resilience ची test होत असते.....ह्या परिस्थिती मधून सुखरूप बाहेर पडले, ह्यासाठी तुला✌️👏.....one appreciating thing is : u aren't bitter about this incidence but look back as a learning experience.....stay blessed
ReplyDeleteधन्यवाद.. मला कळेल का हे कोण आहे
DeleteMona Kulkarni, Nashik
DeleteThank you so much Mona 😘🙏🏻
DeleteEvery experience will help you to grow more... please keep this life mission going..
ReplyDeleteThank you so much dear
Deleteमाझाही त्या दिवसाचा अनुभव असाच आहे.मी ही अंधेरीतच अडकून पडून बांद्रापर्यत पोहचलो...नंतरच सारेच जवळपास तसेच पण अनुभवच होता!
Deleteकधीतरी विस्ताराने लिहिन....
Tu great Ch ahes ggg 🙌🏻❤️
ReplyDeleteThanks but who's this?
Deleteथरारक! तुमची जिद्द आणि हिंमत सगळंच श्वास रोखून वाचायला भाग पाडणारं आहे! प्रत्यक्ष अनुभवत असल्या सारख भासतय. पण देव तारी त्याला कोण मारी! मीसुद्धा मध्यरेल्वे मध्ये अडकून पडले होते.
ReplyDelete- प्रतिक्षा समेळ.
-
प्रतिक्षा जी.. मनापासून धन्यवाद, इतकी छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल.. तुम्ही ही अडकला होतात ? खरंच खूप थरारक अनुभव..
Deleteमी त्यावेळी चेन्नई इथे राहत होतो। त्यामुळं त्यातून वाचलो होतो पण जे ऐकत होतो आणि पाहत होतो ते भयावह होते।
ReplyDeleteहो.. खरंय..
DeleteParmeshwarachi krupa v mitra maitrinichya shubhechha ya sarvanmulech tu tya jeevghenya prasangatun vachlis. Tuzya tya velchya dhairyala tulna nahi. Great!
ReplyDeletePranita Bhalerao (Madhuri Divekar)
Thanks dear Madhuri.. you said is ryt
DeleteSanjay Oswal
ReplyDeleteTalegaon Dabhade
खरंच खूप भयावह होत हे
हो रे संजू, आज ही आठवलं की काटा येतो अंगावर
Deleteखूप डेंजरस परिस्थिती होती त्या वेळेची.
ReplyDeleteदेवाचे धन्यवाद की तू अगदी सुखरूप निघालीस त्यातूनही बाहेर...
मी ही अनुभवला मुंबईचा पाऊस.त्या परिस्थितीत असं वाटतं की आपण जिवंत इथून बाहेर पडूच शकत नाही.
पपण देवाचे खुप खुप आभार
पूजा सोनार
हो राणी.. खरंय हे
DeleteThat day was really horrible. Priya your experience shows the real spirit of Mumbai. Keep blogging dear.
ReplyDeleteThank you so much.. may I know your name?
DeleteSmita
DeleteOhh.. thank you so much deary
Deleteकाळजाला हात घालणारे लिखाण .. असे प्रसंग कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद.. आपलं नाव कळू शकलं तर बरं होईल
Deleteखूपच थरारक अनुभव !अश्या पाण्यात पोहता येऊनही काही उपयोग नसतो.
ReplyDeleteहो खरंय.. धन्यवाद.. आपलं ही नाव कळल्यास बरं होईल
Deleteआठवतंय मला पण..त्याचे वर्णन मी जाई जुई च्या वादळात केले आहे.. it was horrific but I'm glad तुम्हाला देवरुपी माणसे त्या दिवशी मिळाली. God bless them and Thanks for sharing so thrilling adventurous experience with us. God bless you as well 🙏🏻
ReplyDeleteUmmmmmmmmmah सुवर्णा 🩷😘
Delete