माझ्या मनातलं गाणं
माझी आवडती गाणी म्हणजे प्रचंड मोठी यादी . पण आज मी *जिहाले मस्किन मुकुन बा रंजीश बहाल ए हिजरा बेचारा दिल है* या गाण्याचा उल्लेख करेन... लता दीदी आणि शब्बीर कुमार यांच्या सुरात, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार साहेब यांचं हे गीत गुलामी या चित्रपटातील आहे.. अत्यंत सुरेख आणि भावस्पर्शी रीत्या चित्रीत झालेलं हे गाणं काळजाला हात घातल्याशिवाय रहात नाही.. साधारण मतितार्थ असा नायिका उदास असते, नायक तिला भरोसा देतोय की मी तुझ्यासोबत आहे, मिथुन दा यांचं *कोई शक?* कोणी विसरू शकेल खरंच ? नायिका गाते आहे की माझ्याकडे कृपया कुठल्याही शत्रुते ने नका पाहू कारण माझं हृदय आधीच विरहाच्या आगीने पोळले आहे.. पण मला हे ही कळत नाहीये की आत्ता जे धडधडते आहे ते तुझं हृदय आहे की माझं... *वो आके पहलू में ऐसे बैठे के शाम रंगिन हो गयी है, जरा जरा सी खिली तबीयत जरा सी गमगीन हो गयी है...* नायिका संभ्रमात आहे की खरं तर माझी आवडती व्यक्ती माझ्याजवळ माझ्या शेजारी येऊन बसल्याने माझी संध्याकाळ इतकी सुरेख झाली आहे पण.. त्यामुळे इतकं छान वाटतंय पण तरी ही थोडं उदास पण...