Posts

26 July 2005 An unforgettable day

 २६ जुलै २००५, माझ्या आयुष्यातला अत्यंत भयावह आणि आठवणीत कोरला गेलेला दिवस.. अख्खा महाराष्ट्र भर पावसाने धुमाकूळ घातला होताच पण मुंबई मध्ये मी तो पूर्ण दिवस आणि रात्र  ज्या पद्धतीने जीव मुठीत धरून काढला ते कधीच विसरू नाही शकत. खरं तर मी नुकतीच मुंबईला गेले होते आणि रिलायन्स इन्फोकॉम मध्ये नोकरी करायला सुरुवात केली होती.. राहायला सेंट्रल माटुंगा आणि नोकरीसाठी चर्चगेट गाठावे लागायचे रोज.. त्या दिवशी मला आठवत नाही पण कशासाठी तरी मी सुट्टीवर होते आणि अचानक काही कामासाठी मला अंधेरी मध्ये सातबंगला येथे जायला लागलं.. माटुंग्याहून दुपारी एक दीड वाजता निघून इच्छित स्थळी पोचायला मला साधारण अडीन वाजले होते, पाऊस सकाळपासून थांबायचं नावच घेत नव्हता. मी मुंबईमध्ये अनुभवत असलेला पहिलाच जोरदार पाऊस होता तो. मी माझे काम करून साधारण अर्ध्या पाऊण तासाने तिथून बाहेर पडले आणि जरा हबकलेच.  पावसाने इतका जोर पकडला होता की समोरचं तर काही दिसत नव्हतं च पण ज्या इमारतीत मी गेले होते, तिच्या पार्किंग मध्ये पूर्णपणे पाणी भरलं होतं. मी बाहेर येऊन बघते तर काय, नदीचं वाहायला लागली होती जशी.. माझ्या गुडघ्...

My most favourite heroine -. माझी अत्यंत आवडती नायिका

ती आली, तिने पाहिलं आणि तिने माझे मन पूर्ण काबीज केलं की राव.. हो माझी लाडकी *श्रीदेवी*  अगदी लहान वयात तिचा पाहिलेला सिनेमा हिम्मतवाला.. *नैनो में सपना*  या गाण्यातला पूर्ण पडदा व्यापून टाकणाऱ्या तिच्या काळजाचा वेध घेणाऱ्या टपोऱ्या , बोलक्या डोळ्यांचा क्लोज अप ... जस्ट *awesome* खरं तर साठ chya दशकात जन्मलेल्या या मद्रासी मुलीने खूप लहानपणी सिनेमा करायला सुरुवात केली, पण मला भावलेली नायिका म्हणजे हिम्मतवाला मधली तिने साकारलेली उर्मट रेखा नावाची मुलगी जिला नायक अंतर्बाह्य बदलून टाकतो.. जीतुजी आणि श्री यांनी जवळपास *हिम्मतवाला, जानीदोस्त,तोहफा,मवाली, हिम्मत और मेहनत,औलाद, मजाल, जस्टिस चौधरी, घर संसार, धर्म अधिकारी, बलिदान,सुहागन,आग और शोला* इतके सिनेमे एकत्र केले, अत्यंत देखणी जोडी शोभायची दोघांची. माझी ती इतकी जास्त लाडकी नायिका होती की तिच्या विरोधात बोलणाऱ्या माझ्या शाळकरी मित्रमैत्रिणी सोबत माझ्या मारामाऱ्या झाल्यात...😃😃 त्यानंतर आला Mr. India... त्यामधील सुंदर, गडबडी, हुशार, चतुर  वार्ताहर सीमा.. यातल्या तिच्या आणि अन्नू कपूरच्या मजेदार पात्रांना कसं बरं विसर...

माझ्या मनातलं गाणं

माझी आवडती गाणी म्हणजे प्रचंड मोठी यादी . पण आज मी *जिहाले मस्किन मुकुन बा रंजीश बहाल ए हिजरा बेचारा दिल है* या गाण्याचा उल्लेख करेन... लता दीदी आणि शब्बीर कुमार यांच्या सुरात, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार साहेब यांचं हे गीत गुलामी या चित्रपटातील आहे.. अत्यंत सुरेख आणि भावस्पर्शी रीत्या चित्रीत झालेलं हे गाणं काळजाला हात घातल्याशिवाय रहात नाही.. साधारण मतितार्थ असा नायिका उदास असते, नायक  तिला भरोसा देतोय की मी तुझ्यासोबत आहे, मिथुन दा यांचं  *कोई शक?* कोणी विसरू शकेल खरंच ? नायिका गाते आहे की  माझ्याकडे कृपया कुठल्याही शत्रुते ने  नका पाहू कारण माझं हृदय आधीच विरहाच्या आगीने पोळले आहे.. पण मला हे ही कळत नाहीये की आत्ता जे धडधडते आहे ते तुझं हृदय आहे की माझं... *वो आके पहलू में ऐसे बैठे के शाम रंगिन हो गयी है, जरा जरा सी खिली तबीयत जरा सी गमगीन हो गयी है...* नायिका संभ्रमात आहे की खरं तर माझी आवडती व्यक्ती माझ्याजवळ माझ्या शेजारी येऊन बसल्याने माझी संध्याकाळ इतकी सुरेख झाली आहे पण.. त्यामुळे इतकं छान वाटतंय पण तरी  ही थोडं उदास पण...

हे जीवन सुंदर आहे

आज आयुष्यात मी इथे पहिल्यांदा व्यक्त होणार असल्याने विनंती करते की काही चुकल्यास आपलं मानून माफ करा... आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण,प्रत्येक व्यक्ती बरंच काही शिकवून जातात नाही आपल्याला?एखाद्यावर मनापासून विश्वास ठेवावा आणि त्याने त्या विश्वासाला सहज सुरुंग लावून चिंधड्या उडवाव्या त्याच्या.. असं कितीतरी वेळा होतं नाही? पण तरीही आपण आपली सकारात्मकता पणाला लावतो की कायम. का होत असावे असे? हा विचारपण येतो मनात पण आपल्या मनाची रचनाच अशी घडवली गेलीय ना की आपण कुणावर जास्त राग किंवा विखार नाही ठेवू शकत फार वेळ ..आणि मी म्हणते का ठेवायचा वाईट भावनांचा कचरा मनात साठवून? इतकं सुरेख आयुष्य आहे आपलं, मनात मण मण कचरा साठवून त्या सुरेख आयुष्याचा उकिरडा का बनवायचा आपण? मी असं ऐकलंय की प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते. मग त्या दडलेल्या मुलाची निरागसता, वाईट गोष्टी विसरून जाण्याची सवय, त्याचं निर्मळ हास्य या सगळ्या इतक्या सुंदर भावनांना का दडपून टाकतात माणसं? असूया, हेवेदावे, मत्सर,सूड या गोष्टींना आपण खरं तर सहज टाळू शकतो पण नाही .. नाही करत आपण तसे.. का बरं आपण आपली च...