My most favourite heroine -. माझी अत्यंत आवडती नायिका
ती आली, तिने पाहिलं आणि तिने माझे मन पूर्ण काबीज केलं की राव..
हो माझी लाडकी *श्रीदेवी* अगदी लहान वयात तिचा पाहिलेला सिनेमा हिम्मतवाला.. *नैनो में सपना* या गाण्यातला पूर्ण पडदा व्यापून टाकणाऱ्या तिच्या काळजाचा वेध घेणाऱ्या टपोऱ्या , बोलक्या डोळ्यांचा क्लोज अप ... जस्ट *awesome*
खरं तर साठ chya दशकात जन्मलेल्या या मद्रासी मुलीने खूप लहानपणी सिनेमा करायला सुरुवात केली, पण मला भावलेली नायिका म्हणजे हिम्मतवाला मधली तिने साकारलेली उर्मट रेखा नावाची मुलगी जिला नायक अंतर्बाह्य बदलून टाकतो.. जीतुजी आणि श्री यांनी जवळपास *हिम्मतवाला, जानीदोस्त,तोहफा,मवाली, हिम्मत और मेहनत,औलाद, मजाल, जस्टिस चौधरी, घर संसार, धर्म अधिकारी, बलिदान,सुहागन,आग और शोला* इतके सिनेमे एकत्र केले, अत्यंत देखणी जोडी शोभायची दोघांची. माझी ती इतकी जास्त लाडकी नायिका होती की तिच्या विरोधात बोलणाऱ्या माझ्या शाळकरी मित्रमैत्रिणी सोबत माझ्या मारामाऱ्या झाल्यात...😃😃
त्यानंतर आला Mr. India... त्यामधील सुंदर, गडबडी, हुशार, चतुर वार्ताहर सीमा.. यातल्या तिच्या आणि अन्नू कपूरच्या मजेदार पात्रांना कसं बरं विसरायचं? त्यात तिचं चार्ली चॅप्लिन बनून क्लब मध्ये गोंधळ करणं, आधी सगळ्या मुलांना पाण्यात पाहून नंतर त्यांच्या उपाशी, केविलवाण्या चेहेऱ्यावर खाऊ देऊन हसू फुलवताना स्वतःचे अश्रू अवरणं केवळ अफाट.. नंतर हवाहवाई ची नृत्यधमाल, आणि सरतेशेवटी Mr India बनलेल्या नायकासोबतचे कमालीचे दिलखेचक गाणे, त्यातली प्रेमातुर अदा केवळ कातीलाना.. अंगभर साडी नेसून पण स्त्री किती मोहक आणि मादक दिसू शकते हे तिने कायम सिद्ध केलं..
अचानक ती चांदनी बनून आली आणि कमाल झाली.. यश चोप्रा यांच्या नायिकेला पेश करण्याच्या खास शैली मध्ये ... त्यांची नायिका म्हणजे मोहक, आरस्पानी सौंदर्य लाभलेली अशीच असायची .. त्यात श्रीदेवी सारखी उंच, कमनीय बांधा असणारी, डौलदार नृत्याप्सरा सापडल्यावर काय उत्तम वापर केला जाऊ शकतो या कॉम्बिनेशन चा हे चांदनी पाहिलेल्या सगळ्यांना पटेल .. कोण विसरू शकेल आधीची अल्लड अवखळ, प्रियकरावर जीव उधळून देणारी त्याला जपणारी आणि प्रेमभंग झाल्यावर दुसऱ्या शहरात जाऊन अत्यंत संयमी वागणारी चांदनी.. लाजवाब होते तिचे ते काम..
त्यानंतर आलेल्या चालबाज मधल्या अंजू मंजू ला काय म्हणावं... एक घाबरट, वेंधळी, भोळी आणि दुसरी बिनधास्त, चलाख , लोकांना वेड्यात काढून नृत्याचे कार्यक्रम करून आजारी आईच्या उपचारासाठी झटणारी *किसी के हाथ ना आनेवाली* लडकी.. वाह.. धमाल मस्ती.. सदमा मधली ही तिची दोन वेगळी रूपे किती कोरली गेली आहेत प्रेक्षकांच्या मनात.... नंतर आलेल्या नगिना मधली तिने साकारलेली नागिण, मै तेरी दुश्मन म्हणत अमरीश पुरी ना दिलेली खुन्नस निव्वळ अप्रतिम..
गुरुदेव मध्येही तिने दुहेरी भूमिका केली...तिचे बरेच सिनेमे बऱ्याच नायकांसह आले. नया कदम, नजराणा मास्टरजी, मकसद हे राजेश खन्ना सोबत, जॅकी श्रॉफ सोबत कर्मा, जवाब हम देंगे , पत्थर के इंसान, मै तेरा दुश्मन, मिथुन सोबत गुरु, वक्त की आवाज, जाग उठा इंसान वगैरे, गोविंदा सोबत पण तिने गैर कानूनी, शत्रुघ्न सिन्हा सोबत शेरनी, फिरोझ खान सोबत जांबाज, अनिल कपूर सोबत लाडला, राम अवतार, रूप की रानी चोरों का राजा, जुदाई, अमिताभ सोबत आखरी रास्ता, इंकीलाब, खुदा गवाह वगैरे बरंच काम केले... तिचे सिनेमे शक्यतो नायिका प्रधान असत..
नंतर नंतर सलमान अक्षय अशा तिच्यासाठी नव्या असणाऱ्या नायकांसोबत काम करून अस्तित्व टिकवण्याची तिची धडपड मात्र अयशस्वी ठरत गेली, तिचा महत्वाकांक्षी चित्रपट रूप की रानी चोरोंका राजा सपशेल आपटला.. तोवर लग्न करून तिने दोन मुलींची आई, एक गृहिणी म्हणून छान रमवून घेतलं स्वतःला... अगदी भाजी, मासळी सगळी खरेदी करण्यापासून ते मुलींना शाळेत सोडण्या पर्यंत सगळं अत्यंत साधेपणाने ही रूप की रानी करत राहिली, नंतर खूप वर्षांनी तिने पुनरागमन केले ते इंग्लिश विंग्लिश मधून.. त्यातली ही साधीसुधी शशी, ते स्मार्ट शशी हा प्रवास अत्यंत गोड साकारला तिने.. नंतर मॉम नावाचा एक वेगळाच सिनेमा ही केला, कन्या जान्हवी हिच्या सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शन होण्या आधीच या माझ्या लाडक्या श्रीदेवी ने घेतलेली अकाली एक्झिट मला अजूनही खूप जास्त त्रास देत राहते.. खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर श्रीदेवी, जगातून गेलीस, तरी मनातून कधीच नाही जाणार तू...
प्रिया तुळजापूरकर
०४/०५/२०२०

खरंच सुंदर वर्णन एक महा नायिकेचा ,i like
ReplyDeleteThank you ... Will you please writ your name?
Deleteछान लिहिले
DeleteThank you.. pan please write your names with comments na
Deleteखुप मस्त.....सुंदर ...लिहीलय👌👌
ReplyDeleteहवाहवाई💃
Thanks dear
DeleteKhup masta tayde
ReplyDeleteSridevi Indeed a super star✨ Matchless & Iconic. Well described by an actress herself 👍
ReplyDelete😊🩷🌷💜
DeleteHello Priya, Suvarna here.
ReplyDeleteखूप सुंदर लेख आहे. माझी पण आवडती अभिनेत्री आहे श्रीदेवी.
तिचे काही interviews पाहिले,त्यात तिने mention केलंय की ती 11 वर्षाची असताना as a Heroine चे काम केले होते. It was baffling but kudos to her. Missing such a vivacious and extraordinary actress 🙏🏻🙏🏻🙏🏻
Again beautiful article. Plz do write more.
Thank you so much dear.. I also miss her like hell yaar.. she was really an example of a feminine beauty n great acting n dancing skills with a good human nature..
Delete🥰🥰🥰
Delete