माझ्या मनातलं गाणं

माझी आवडती गाणी म्हणजे प्रचंड मोठी यादी . पण आज मी *जिहाले मस्किन मुकुन बा रंजीश बहाल ए हिजरा बेचारा दिल है* या गाण्याचा उल्लेख करेन... लता दीदी आणि शब्बीर कुमार यांच्या सुरात, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार साहेब यांचं हे गीत गुलामी या चित्रपटातील आहे.. अत्यंत सुरेख आणि भावस्पर्शी रीत्या चित्रीत झालेलं हे गाणं काळजाला हात घातल्याशिवाय रहात नाही..

साधारण मतितार्थ असा नायिका उदास असते, नायक  तिला भरोसा देतोय की मी तुझ्यासोबत आहे, मिथुन दा यांचं  *कोई शक?* कोणी विसरू शकेल खरंच ?

नायिका गाते आहे की  माझ्याकडे कृपया कुठल्याही शत्रुते ने  नका पाहू कारण माझं हृदय आधीच विरहाच्या आगीने पोळले आहे.. पण मला हे ही कळत नाहीये की आत्ता जे धडधडते आहे ते तुझं हृदय आहे की माझं...

*वो आके पहलू में ऐसे बैठे के शाम रंगिन हो गयी है, जरा जरा सी खिली तबीयत जरा सी गमगीन हो गयी है...*

नायिका संभ्रमात आहे की खरं तर माझी आवडती व्यक्ती माझ्याजवळ माझ्या शेजारी येऊन बसल्याने माझी संध्याकाळ इतकी सुरेख झाली आहे पण.. त्यामुळे इतकं छान वाटतंय पण तरी  ही थोडं उदास पण वाटतंय..

खरंच किती हुरहूर असते ना नाती जुळणे, नाती तुटणे, पुन्हा कुणी आयुष्यात येताना थोडे से साशंक होणे...

*अजीब हैं दिल के दर्द यारा ना हो तो मुश्किल है जीना इसका, जो हो तो हर दर्द है एक हीरा, हर एक गम है nagina इसका*

नायकाचे म्हणणे की खरंच आपल्या मनाला म्हणावं  तरी काय किती अजब वेदना असतात नाही का त्यात सामावलेल्या... त्या नसतील तर जगणं मुश्किल होऊन जायचं.. आणि जेव्हा असतात तेव्हा प्रत्येक वेदना हीरा आणि दुःख मौल्यवान रत्न वाटतं नाही का?

*कभी कभी शाम ऐसे ढलती हैं कैसे घुंघट उतर रहा है,  तुम्हारे सीने से उठता धुवां हमारे दिल से गुजर रहा है*


 नायिका म्हणते की कधी कधी सूर्य मावळताना वाटतं की कुणाच्या मुखड्यावरून पदर दूर होतोय... तेवढ्यात नायक म्हणतो दुःखी नायिकेला की अग तुझ्या हदयातल्या दुःखाची धग माझ्या हृदयात जाणवते आहे ग मला...

*ये शर्म है या हया है,  क्या है?नजर उठाते ही झुक गयी है, तुम्हारी palkon से गिर के शबनम हमारी आँखो में रुक गयी है..*

इथे नायिका थोडी सावरली आहे  पण तरी संकोचून दूर बसलेली आहे तर नायक विचारतो की तुला लाजेने संकोचल्यासारखे होते आहे का? नायिका खूप भावूक होऊन उत्तर देते की तुझ्या पापण्यांमधले अश्रू दवबिंदू होऊन माझ्या नयनात येऊन विसावले आहेत.. आणि अशा तऱ्हेने दोघांमधले अंतर मिटून ते समीप आलेले या गाण्याच्या शेवटी दाखवलं आहे..

मला इतकं जास्त बरं नाही लिहिता येत.. खूप अचानक ठरवून लिहिते आहे.. पण खूप जवळ आहे हे गाणं माझ्या मनाच्या

*प्रिया तुळजापूरकर*

२६/०३/२०२०

Comments

  1. Priya you are a beautiful person from heart so you have listen and understand this song from your heart and explain it very beautiful.While reading we can feel the feelings and live picture comes in front of us.So from the world of my heart I thank you for these beautiful explanation.Hope you write some more beautiful lines which comes straight from your heart.

    Rahul Raut

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much Rahul.. your appreciation is an inspiration ..

      Delete
  2. छान लिहिलय .. सुंदर

    गाणे ऐकले होते.. आवडले ही होते...

    अर्थ नीट आज कळला 👌👌👌👌👌👌👌

    अशीच लिहित रहा....

    उमाकांत

    ReplyDelete
    Replies
    1. उमाकांत.. धन्यवाद.. प्रयत्न केलाय मनापासून.. जमल्यास तुमच्या मित्र maitrinana लिंक शेअर करून वाचून कॉमेंट करायला सांगा

      Delete
  3. Khup wegla gaana ahe

    Sahaj gaana mhantahi yet nahi

    Khup chan explain kelay

    Tyamule ya ganyakade maza laksha jatay

    Tuzyamule malahi he gaana awadayla laglay


    ReplyDelete
    Replies
    1. मला कळू शकेल हे कुणी कौतुक केलाय माझं?

      Delete
    2. Very beautifully written I understood the meaning of this song now .

      Delete
  4. Nice to get the meaning of such beautiful song
    Keep it up, we are waiting for few more
    Vikas

    ReplyDelete
  5. वाह ...प्रिया ma'am... मस्त😍

    ReplyDelete
  6. Mind-blowing 👌👌. She expressed it thoroughly with deeep words . Salute to her understand and most importantly she could represent it in words too. So it's just Fabulous. Keep it Priya 🎉🎉

    ReplyDelete
  7. Artical मस्त झालं आहे. लिखाण सुरू ठेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हे जीवन सुंदर आहे

26 July 2005 An unforgettable day