हे जीवन सुंदर आहे


आज आयुष्यात मी इथे पहिल्यांदा व्यक्त होणार असल्याने विनंती करते की काही चुकल्यास आपलं मानून माफ करा...


आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण,प्रत्येक व्यक्ती बरंच काही शिकवून जातात नाही आपल्याला?एखाद्यावर मनापासून विश्वास ठेवावा आणि त्याने त्या विश्वासाला सहज सुरुंग लावून चिंधड्या उडवाव्या त्याच्या.. असं कितीतरी वेळा होतं नाही? पण तरीही आपण आपली सकारात्मकता पणाला लावतो की कायम. का होत असावे असे? हा विचारपण येतो मनात पण आपल्या मनाची रचनाच अशी घडवली गेलीय ना की आपण कुणावर जास्त राग किंवा विखार नाही ठेवू शकत फार वेळ ..आणि मी म्हणते का ठेवायचा वाईट भावनांचा कचरा मनात साठवून? इतकं सुरेख आयुष्य आहे आपलं, मनात मण मण कचरा साठवून त्या सुरेख आयुष्याचा उकिरडा का बनवायचा आपण?

मी असं ऐकलंय की प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते. मग त्या दडलेल्या मुलाची निरागसता, वाईट गोष्टी विसरून जाण्याची सवय, त्याचं निर्मळ हास्य या सगळ्या इतक्या सुंदर भावनांना का दडपून टाकतात माणसं? असूया, हेवेदावे, मत्सर,सूड या गोष्टींना आपण खरं तर सहज टाळू शकतो पण नाही .. नाही करत आपण तसे.. का बरं आपण आपली चूक सहज मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा नाही दाखवू शकत? खरोखर आपला अहंकार इतका मोठ्ठा झालाय? आपल्या माणसांपेक्षा? आपल्या नात्यांपेक्षा? कधी विचार करणार आपण याबाबत? तो माझ्याशी असाच का वागला ? ती माझ्याशी का बरं उगीच भांडली? यातच का आपण गुंतून जातो? का विसरतो की आपणच आपल्या नात्यांचे बंध आपल्या वागण्यामुळे तटातट  तोडत चाललोय ते..

खरंतर या सगळ्यांचा विचार मला सतत भंडावून सोडतो, बराच वेळा मी मेंदू ला गदा गदा हलवलं आहे राव.. आताशा मला उत्तरं मिळायला लागली आहेत ती पुढीलप्रमाणे असावीत . आजकाल सगळेजण *सोशल मीडिया* या गोंडस नावाच्या प्रेमात पडलेले आहेत, तिथल्या आभासी जगाला खरं मानून जगायला लागले आहेत. तिथे असणारे लोक आपल्या बऱ्याच गोष्टींना अंगठा , बदाम, फुलं, मिठ्या असं काहीतरी पाठवून देतात आणि आपण ते सारं खरं समजून खुश होत राहतो.. त्यांना आपले खरे मित्र मैत्रिणी मानून त्यांच्यासमवेत आपल्या खाजगी गोष्टी उघड करू पाहतो.. त्या नात्यांना खरं मानून आपल्या खरोखरचे नातेसंबंध दूर करू पाहतो.. काही जण तर चक्क स्टेटस मिरवतात " busy" किंवा "no calls only WhatsApp"

अरे का असं करता यार? आपणच असं वागून आपल्या माणसांना दूर करायचं? आणि एकीकडे रडगाणे गायचे की हल्ली कुणी कुणाशी संबंधच नाही ठेवत, कुणाला वेळच नसतो आमच्याशी बोलायला , वगैरे वगैरे... अहो पण तुम्ही स्वतः च लोकांसाठी मोबाईल मध्ये असे मेसेज ठेऊन कोरडेपणा दाखवता आहात तर नात्यांमधला  ओलावा , गोडवा संपाय ला कितीसा वेळ लागेल सांगा बरं..

कुठे फिरायला जरी गेलो आपण  सुट्टी घेऊन तिथे जाताना, तिथे गेल्यावर पण तिथले छान क्षण, तिथल्या निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं सोडून लोक तिथे सेल्फी काढत बसतात, ते लगेच सोशल मीडिया वर टाकून त्यावर येणाऱ्या कॉमेंट्स साठी मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसून राहतात... काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही, तेव्हा अस्वस्थपणा चा कळस गाठतात.. सेल्फी च्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालतात.. अरे का असं?  कशाला फुकट पैसे खर्च करायचे मग फिरून येण्यासाठी? घरीच बसा ना गपचुप.. तसे ही बरेच app तुम्हाला खूप निरनिराळे पृष्ठभाग वापरून फोटो बनवून देऊ शकतात की..

असं आभासी जगणं खरंच थांबवा माझ्या मित्र मैत्रिणींनो.. आयुष्य खरोखर मजेत जगायचं असेल तर भाराभर आभासी नाती वाढवत बसण्यापेक्षा आपले खरे खुरे मित्रमैत्रिणी, आपले आप्तेष्ट यांच्याशी तुटत चाललेला संवाद सुधारायला सुरुवात तर करून पाहा.. खरं सांगू? आपल्याला खऱ्या आयुष्यात जेव्हा अडी अडचणी तून बाहेर काढायला आभासी मित्र नाही येत ते फक्त "टेक केअर, good night" म्हणत गायब होतात पण तुमच्या आवाजातल्या बदलाला पटकन समजून घेऊन तुमच्यासाठी तुमचे खरेखुरे आपले लोकच धावून येतात.. हे कधीच विसरू नका.. छान वागा , मस्त जगा..

माझ्या लिखाणावर नक्की अभिप्राय कळवत रहा.. 

Comments

  1. Mala agadi manoman parlay.khun chhan.

    ReplyDelete
  2. Mala agadi manoman parlay.khun chhan.

    ReplyDelete
  3. छान विचार,मनापासून बोलतेयस ते जाणवतंय...virtual पेक्षा actual कडे लोक लक्ष देतील, तिथले संबंध जिव्हाळ्याने जपतील तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर झालेलं भासेल...keep writing... keep us reading....

    ReplyDelete
  4. Priya you are a beautiful person from heart so you have listen and understand this song from your heart and explain it very beautiful.While reading we can feel the feelings and live picture comes in front of us.So from the world of my heart I thank you for these beautiful explanation.Hope you write some more beautiful lines which comes straight from your heart.

    ReplyDelete
  5. Priya you are a beautiful person from heart so you have listen and understand this song from your heart and explain it very beautiful.While reading we can feel the feelings and live picture comes in front of us.So from the world of my heart I thank you for these beautiful explanation.Hope you write some more beautiful lines which comes straight from your heart.

    Rahul Raut

    ReplyDelete

Post a Comment